Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसिका सुनीलला प्रियकराने अशाप्रकारे केले प्रपोज, क्षणात दिला रसिकाने होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 15:45 IST

रसिकाने आदित्यसोबतचा फोटो शेअर करत त्याने तिला कशाप्रकारे प्रपोज केले हे सांगितले आहे

ठळक मुद्देरसिकाने शेअर केलेल्या फोटोत आदित्य गुडघ्यावर बसून रसिकाला प्रपोज करत असून रसिकाच्या हातात अंगठी घालत आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असे सरप्राईज आदित्यने मला दिले असून त्याने मला एका वेगळ्या अंदाजात प्रपोज केले.

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारत होती. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता नुकतेच रसिकाने आदित्यसोबतचा फोटो शेअर करत त्याने तिला कशाप्रकारे प्रपोज केले हे सांगितले आहे.

रसिकाने शेअर केलेल्या फोटोत आदित्य गुडघ्यावर बसून रसिकाला प्रपोज करत असून  रसिकाच्या हातात अंगठी घालत आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असे सरप्राईज आदित्यने मला दिले असून त्याने मला एका वेगळ्या अंदाजात प्रपोज केले. आमची त्या दिवशी लव्ह एनिव्हर्सरी होती. त्यामुळे मी कपडे काय घालायचे हे देखील त्यानेच सांगितले होते. तसेच त्याने लॉस एंजिलिस शहराची हॅलिकॉपटर राईड घडवली. त्याने गुडघ्यावर बसून मला प्रपोज केले, खरे तर या क्षणाच्या आधीच मी त्याला होकार देण्यासाठी तयार होते. 

रसिका सुनीलने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, अनपेक्षितपणे जानेवारी २०२० मध्ये प्रेमात पडले. लाँग डिस्टन्स नाते आहे. अखेर दहा महिन्यांनंतर आदित्य बिलागीला पाहू शकले. मला माहीत आहे मी इथे आल्यापासून आम्ही भावनांच्या रोलर कोस्टरमधून गेलो आहोत. मग आजी आम्हाला सोडून गेली. त्यानंतर आम्ही दोघे आजारी पडलो. प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत होते तर सर्व क्षण तुझ्यापासून लांब आहे. तू नकळत मला दररोज तुझ्याबद्दल आदर आणि प्रेम करण्याची लाखो कारणे दिली आहेस. आपल्या या मोहक प्रवासाला एक वर्षेदेखील झाले. 

टॅग्स :रसिका सुनिल