Join us

रश्मीवर स्पर्धकांचा हल्लाबोल!

By admin | Updated: May 20, 2015 23:16 IST

‘नच बलिये ७’ची स्पर्धक रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांच्या खोट्या रडगाण्यावर इतर स्पर्धकांनी हल्लाबोल केला आहे.

‘नच बलिये ७’ची स्पर्धक रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांच्या खोट्या रडगाण्यावर इतर स्पर्धकांनी हल्लाबोल केला आहे. मागील आठवड्यात रश्मीने पाय दुखावल्यामुळे परफॉर्मन्स दिला नव्हता. मात्र हे खोटे असून ती लॉस एन्जेलीसमध्ये कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स करण्यास गेल्याचा आरोप स्पर्धक सना सय्यद, ऐश्वर्या सकुजा आणि संग्राम सिंग यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रश्मीने शोमधून काढू नका अशी विनवणी करीत शोमुळेच मी व माझा पती पुन्हा एकत्र येत आहोत. याच दरम्यान गर्भपात झाल्याचेही तिने सांगितले. मात्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठीच रश्मी नाटक करीत असल्याचे या स्पर्धकांनी म्हटले आहे.