'बिग बॉस मराठी ६'मध्ये सध्या एक प्रकरण चर्चेत आहे. अनुश्री मानेने राकेश बापटवर गंभीर आरोप केला आहे. राकेशने आपल्याला परवानगी नसताना स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनुश्रीच्या या आरोपांवर इंडस्ट्रीतूनही अनेक प्रतिक्रिया आल्या. 'राकेश असं करु शकत नाही, त्याच्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत' असं मत अनेकांनी व्यक्त केलं. घरातील काही सदस्यांनीही राकेशची बाजू घेतली. अनुश्रीच्या आरोपांनंतर राकेश बापटही खूप भडकला.इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये कधीच कोणीही असा आरोप केला नाही असं तो म्हणाला. आता राकेशची बहीण शीतल बापटने भावासाठी पोस्ट लिहिली आहे.
राकेश बापटची बहीण शीतल बापट या पॅरेंटिंग कोच, करिअर मार्गदर्शकही आहेत. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, "वुमन कार्ड खेळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कित्येक महिला याचा गैरवापर करतात आणि ज्या खऱ्या पीडित महिला आहेत त्यांना आवश्यक तेव्हा मदत मिळत नाही. अशा महिलांमुळे इतर सर्वच महिलांबाबतही चुकीचा समज निर्माण होतो. सशक्त महिला कधीच असा गैरवापर करत नाहीत. पण मला याने फरक पडत नाही कारण मला माहितीये माझा भाऊ राकेश बापट याबाबतीत कधीच चूक करु शकत नाही. तुमच्या सर्वांचा पाठिंबा बघून बरं वाटलं."
नक्की झालंय काय?
बिग बॉस च्या एका एपिसोडमध्ये अनुश्री माने राकेशच्या बेडवर झोपली होती. राकेशची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याने अनुश्रीला बेडवरुन उठायला सांगितलं. 'प्लीज माझ्या बेडवरुन उठ आणि दुसरीकडे झोप' असं तो तिला सांगत होता. पण अनुश्री उठत नव्हती. त्याने घरातील सदस्यांनाही अनुश्रीला उठवायला मदत करा असं सांगितलं. शेवटी त्याने तिला हात धरुन उठवलं. दुसऱ्या दिवशी अनुश्रीने 'राकेशने माझा हात खेचला, तो असा कसा हात लावू शकतो' असे आरोप केले. तिला रुचिता जामदारनेही साथ दिली. महिला झोपलेली असताना न विचारता तिला असा कसा हात लावून उठवू शकतो असं रुचिता म्हणाली. तर इतर सदस्यांनी राकेशची बाजू घेतली.
Web Summary : Anushree Mane accused Raqesh Bapat of inappropriate touching in Bigg Boss Marathi 6. Raqesh's sister, Sheetal Bapat, defended him, calling the accusation a misuse of the 'woman card,' undermining genuine victims. Other housemates supported Raqesh.
Web Summary : अनुश्री माने ने बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट पर गलत तरीके से छूने का आरोप लगाया। राकेश की बहन शीतल बापट ने उनका बचाव करते हुए आरोप को 'महिला कार्ड' का दुरुपयोग बताया, जिससे वास्तविक पीड़ितों को नुकसान होता है। घर के अन्य सदस्यों ने राकेश का समर्थन किया।