Join us  

दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 8:45 AM

अभिनेत्री दीपिका पादूकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.

मुंबई- अभिनेत्री दीपिका पादूकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. यावर्षाच्या शेवटी दोघंही लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. दोघांच्या लग्नाची चर्चा असतानाचा दोघांच्या घरीही लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. बंगळुरू व मुंबईतील दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्नाची तारीख जरी अजून ठरली नसली तर लग्नासाठीचं ठिकाणं मात्र शोधायला सुरूवात झाली आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नाचं कामकाज पाहणाऱ्या वेडिंग प्लॅनर्सनी लग्नासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाणं शोधायला सुरूवात केल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. 

रणवीर आणि दीपिका दोघांनाही अत्यंत खासगी पद्धतीने लग्न करायचं आहे.लग्नात भरमसाठ पाहुणे नको आहेत. साधेपणाने आणि सुंदर पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असणारे दीपिरा-रणवीर मीडियालाही लग्नापासून लांब ठेवणार आहेत. कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तसंच परदेशात लग्न केल्यानंतर भारतात दोन रिसेप्शन सोहळे पार पडतील, अशी माहिती जवळच्या सुत्रांनी दिली आहे. दोनपैकी एक रिसेप्शन मुंबईत असेल पण त्यासाठीही जागा अजून निश्चित झालेली नाही. 

संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला या सिनेमापासून रणवीर व दीपिकामधील जवळीक वाढली होती. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूड