Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तयारी जोरात, जाणून घ्या लग्नाचा सीक्रेट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:19 IST

दोघांनी याबाबत जाहीरपणे शब्दही काढला नसला सूत्रांच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाचा प्लॅन अनेकांनी प्रकाशित केलाय.

मुंबई : बॉलिवूडचं सध्याचं सर्वात हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही जोडी या वर्षाच्या शेवटी लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे. दोघांनी याबाबत जाहीरपणे शब्दही काढला नसला तरी सूत्रांच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाचा प्लॅन अनेकांनी रिेव्हील केलाय.

कुठे आणि कधी होणार लग्न?

मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर आणि दीपिका या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. दोघांच्याही परीवारांनी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानची तारीख निश्चित केल्याची चर्चा आहे. सध्या त्यांच्या लग्नाची तारीख 8 डिसेंबर ही सांगितली जात आहे. पण याबाबत काहीही अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीये. यांचं लग्न भारतात नाही तर परदेशात होण्याची शक्यता आहे.

कसं होणार लग्न?

या कपलला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. रणवीर आणि दीपिका हे दोघेही आपल्या प्रायव्हसीला फार महत्व देतात. त्यामुळेच दोघांना शाही थाटामाटात लग्न करायचं नाहीये. त्यामुळे त्यांच्या लग्नात फार जवळचे मित्र आणि परीवारातील सदस्यच असतील. 

दोघांचे रिसेप्शन

लग्नानंतर दोघांचेही रिसेप्शन खास असणार आहेत. असे सांगितले जात आहे की, दोघांचे दोन रिसेप्शन होतील आणि त्याची प्लॅनिंगही सुरु झाली आहे. यांचं एक रिसेप्शन हे मुंबईत तर एक रिसेप्शन बेंगळुरुमध्ये होऊ शकतं. 

अशी करताहेत तयारी

दोघांनी लग्नाची तयारी करण्यासाठी वेडिंग प्लॅनरही निवडला असल्याची चर्चा आहे. इतकेच नाहीतर दोन परीवारांमध्ये गिफ्ट एक्सचेंज करण्याचा रिवाजही सुरु झाला आहे. तर दीपिकानेही आपल्या लग्नाची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका तिची आई उजाला यांच्यासोबत एका ज्वेलरी शॉपमध्ये दिसली होती.

नव्या घराचा शोध

दीपिका आणि रणवीर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ओंमकार 1973 मध्ये घर बघण्यासाठी आले होते. याच इमारतीत आधीच विराट आणि अनुष्का यांचं घर आहे. येथील घर दोघांना आणि त्यांच्या परीवारातील सदस्यांना पसंत पडल्याचं बोललं जात आहे. दोघेही लग्नाआधीच या घरात शिफ्ट होऊ शकतात अशी चर्चा आहे.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण