Join us

आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:00 IST

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. लोकप्रियतेच्या चार्टवर रणवीर-दीपिका १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत.

ठळक मुद्देरणवीर-दीपिका नंबर १ तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सच्यानुसार, सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच TVC जगतातले लोकप्रिय कपल बनले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट झाले आहे की,  जाहिरात विश्वातल्या लोकप्रिय जोड्यांमध्ये रणवीर-दीपिका नंबर १ तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत. 

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. लोकप्रियतेच्या  चार्टवर  १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. तर, वरुण आणि आलिया ही जोडी ८६.०२ गुणांसह दुस-या स्थानी आहे. 

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक, अश्वनी कौल, सांगतात, ''रणवीर -दीपिका जोडीने लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले. बॉलिवूडमधले हे कपल सध्याचे सर्वाधिक चर्चित कपल आहे.त्यांची खूप मोठी फॅन फॉलोविंगही आहे. तसेच वरुण आणि आलियाने चार सिनेमे एकत्र केलेत. गेल्या ६ वर्षांपासून ही बॉलिवूडची फेव्हरेट जोडी आहे. वरूण-आलियाचा तरूण पिढीमध्ये चाहतावर्गही खूप आहे.''

अश्वनी कौल पुढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग