Join us

माझ्या या वाईट सवयींमुळे बबिता झाली माझ्यापासून वेगळी, रणधीर कपूर यांनी दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:05 IST

रणधीर आणि बबिता वेगळे झाले असले तरी त्यांनी कधी घटस्फोट घेतला नाही.

ठळक मुद्देया मुलाखतीत सांगितले आहे की, मी खूप दारू प्यायचो. तसेच मी घरी खूप उशिरा जायचो. माझ्या या गोष्टी तिला आवडत नव्हत्या आणि तिला मी तिला जशाप्रकारे हवा आहे तसा मी बदलायला तयार नव्हतो.

बबिता आणि रणधीर यांनी कल आज और कल, जीत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असे. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. बबिता यांनी लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. त्यांना करिश्मा आणि करिना या दोन मुली आहेत. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. बबिता आणि रणधीर वेगळे झाले, त्यावेळी त्यांची लहान मुलगी करिना ही केवळ सात वर्षांची होती. करिना आणि करिश्मा या दोघांचाही सांभाळ बबिता यांनीच केला. बबिता आणि रणधीर वेगळे झाले असले तरी त्यांच्या मुलींच्या प्रत्येक समारंभाला रणधीर आवर्जून उपस्थित असायचे. 

रणधीर आणि बबिता वेगळे झाले असले तरी त्यांनी कधी घटस्फोट घेतला नाही. रणधीर आणि बबिता यांच्या नात्याविषयी त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण रणधीर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे की, मी खूप दारू प्यायचो. तसेच मी घरी खूप उशिरा जायचो. माझ्या या गोष्टी तिला आवडत नव्हत्या आणि तिला मी तिला जशाप्रकारे हवा आहे तसा मी बदलायला तयार नव्हतो. आमचा प्रेमविवाह होता. पण मी जसा होतो तशी ती मला स्वीकरायला तयार नव्हती. आम्हाला दोन मुली आहेत. त्यांचा आम्हाला चांगल्याप्रकारे सांभाळ करायचा होता. पण आम्ही वेगळे झाल्यानंतर देखील बबिताने आमच्या दोन्ही मुलींना खूप चांगल्याप्रकारे सांभाळले. आमच्या मुलींनी देखील त्यांच्या मेहनतीने खूप चांगले करियर बनवले आहे. एक वडील म्हणून मला दुसरे काय पाहिजे?

रणधीर यांनी पुढे सांगितले की, बबिता माझ्या आयुष्याचा आजही महत्त्वाचा हिस्सा आहे. मी आणि बबिता वेगळे झालो असलो तरी आम्हाला दोघांनाही दुसरे लग्न करायचे नव्हते. त्यामुळे आम्ही कधी घटस्फोटाचा विचार देखील केला नाही. 

टॅग्स :रणधीर कपूरबबिता