Join us

बॉक्स ऑफिसवर फिकी पडतेय 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची जादू, १५व्या दिवशी कमावले फक्त काही लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:49 IST

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने १५ दिवसांत किती कमावले? जाणून घ्या कलेक्शन

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा अलिकडेच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. रणदीप हु्ड्डाने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन समोर आलं आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा २२ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. थिएटरमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुलही होत होते. परंतु, आता सिनेमाला थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'स्वातंत्र्यवीर सावकरकर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील जादूही फिकी पडद चालली आहे. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या दिवशी सिनेमाने २.९ कोटी तर दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत पहिल्या आठवड्यात ११.३५ कोटींची कमाई केली होती. 

त्यानंतर या सिनेमाची जादू फिकी पडत चालल्याचं पाहायला मिळालं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात केवळ ६.४ कोटींचा गल्ला जमवला. आता या सिनेमाचं १५ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. १५व्या दिवशी या सिनेमाने अवघ्या ४६ कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत रणदीप हुड्डाच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर १८.२१ कोटींचा पल्ला गाठता आला आहे. 

रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. रणदीपबरोबर या सिनेमात अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे. अंकिताने या सिनेमात वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :रणदीप हुडाअंकिता लोखंडेसिनेमा