Join us

है अपना दिल तो आवारा...रणदीप हुड्डाचा भारतीय जवानांसोबत बॉलिवूड गाण्यांवर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:45 IST

बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडाने अरुणाचल प्रदेशात भारतीय जवानांसोबत बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला.

बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 'सरबजीत' असो वा 'लव्ह आज कल' किंवा 'लाल रंग' आणि 'हायवे', रणदीप हुड्डाने प्रत्येक चित्रपटात अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. रणवीर हुड्डा आज बाॅलीवूडमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक दिवसांपासून रणदीप त्याच्या आगामी 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. तो पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने अरुणाचल प्रदेशात भारतीय जवानांसोबतबॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला.

रणदीप हुड्डा अरुणाचल प्रदेशात असून त्याने भारतीय जवानांसोबत गांधी जयंती साजरी केली. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील मागो चुना भागात भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत  विविध हिट बॉलीवूड गाण्यांवर आनंदात नाचताना दिसत आहे.

रणदीप हुडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'हायवे', 'किक', 'जन्नत 2', 'सरबजीत' आणि 'सुलतान' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने चांगले काम केले आहे.  . रणदीप हुड्डा लवकरच 'वीर सावरकर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याने केवळ अभिनय नाही. तर दिग्दर्शकाचेही काम केले आहे. यासोबतच तो 'इन्स्पेक्टर अविनाश' नावाच्या वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूडभारतीय जवान