Join us

रणबीरला जडले नवे व्यसन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 01:43 IST

रणबीर कपूरला त्याची एक सवय सोडायचीयं. पण मनात आणूनही तो हे करू शकत नाहीयं. होय, सिगारेट स्मोकिंग. सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी रणबीरने अनेक प्रयत्न करून पाहिले, पण तो अपयशी ठरला

रणबीर कपूरला त्याची एक सवय सोडायचीयं. पण मनात आणूनही तो हे करू शकत नाहीयं. होय, सिगारेट स्मोकिंग. सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी रणबीरने अनेक प्रयत्न करून पाहिले, पण तो अपयशी ठरला. कॅटरिनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना हे व्यसन सोडवण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले होते. यासाठी तो कॅटरिनासोबत आॅस्ट्रियन मेडस्पामध्येही गेला होता. याठिकाणी सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी त्याने इंजेक्शनही घेतले होते.यानंतर काही दिवस रणबीर स्मोकिंगपासून दूर राहिला होता. पण आता पुन्हा त्याला या व्यसनाने विळखा घातला आहे. मात्र रणबीरला मनापासून हे व्यसन सोडायचेयं. यासाठी अलीकडे मित्रांच्या सल्ल्यावरून रणबीर सिगारेटऐवजी ई-हुक्का ट्राय करायला लागला. ई हुक्काचे अनेक डिवाईस असे आहेत, ज्यात ना तंबाखू आहे ना निकोटीन. त्यामुळेच सिगारेट सोडण्यासाठी रणबीरने ई-हुक्का ट्राय करायला सुरुवात केली. पण हे काय, आता सिगारेट सोडून रणबीरला याचेच व्यसन जडले. घरातून निघताना सिगारेट पॅकेजऐवजी आता रणबीर ई-हुक्का घेऊन बाहेर पडतो.