Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या घराबाबत रणबीरचा खुलासा

By admin | Updated: November 13, 2014 23:21 IST

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती.

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. रणबीरने मात्र आई-वडिलांपासून वेगळे राहण्याची इच्छा असल्यामुळे नव्हे, तर त्याच्या घरात बांधकाम सुरू असल्याने दुस:या जागी शिफ्ट होत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. रणबीरला जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की, ‘हो मी नव्या घरात शिफ्ट होतोय; पण काही दिवसांसाठी. कारण माङया घरी सध्या बांधकाम सुरू आहे. काही दिवसांनी मी शिफ्ट होणार आहे.’ कॅटरिना त्याच्यासोबत राहणार की नाही, याबाबत मात्र त्याने काहीही बोलायला नकार दिला. ‘अजब प्रेम की गजब कहानी’नंतर रणबीर आणि कॅटरिनाच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत.