Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर-दीपिकावर पाळत ठेवणार कॅट

By admin | Updated: August 20, 2014 21:42 IST

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील नाते आता मैत्रीच्या पुढे गेले आहे. कॅटरिना जीवनात येण्यापूर्वी रणबीरचे मन दीपिकावर जडले होते, हे सर्वानाच माहीत आहे.

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील नाते आता मैत्रीच्या पुढे गेले आहे. कॅटरिना जीवनात येण्यापूर्वी रणबीरचे मन दीपिकावर जडले होते, हे सर्वानाच माहीत आहे. ही जोडी आता ‘तमाशा’ नावाच्या चित्रपटात काम करीत आहे. गेल्या महिन्यात विदेशात झालेल्या शूटिंगमध्ये या दोघांनी सहभाग घेतला होता. शूटिंगनिमित्त रणबीर आणि दीपिका एकत्र आले असताना इकडे कॅटरिना अस्वस्थ होती. या चित्रपटाचे विदेशातील शूटिंगचे शेडय़ूल आता पुन्हा लवकरच सुरू होणार आहे. यावेळी विदेशात कॅटदेखील या दौ:यात रणबीर आणि दीपिकासोबत जाणार आहे.