Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 14:24 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भटला एका शोमध्ये याबाबत विचारले गेले होते. यावर आलिया काहीच बोलली नव्हती. पण तिच्या रिअॅक्शनने सर्वांनाच प्रश्नात पाडले. 

मुंबई : आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. काही दिवसांपासून याबाबत दोघांनाही प्रश्न विचारले जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भटला एका शोमध्ये याबाबत विचारले गेले होते. यावर आलिया काहीच बोलली नव्हती. पण तिच्या रिअॅक्शनने सर्वांनाच प्रश्नात पाडले. 

आलियाला या शोमध्ये रणबीरबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ती फारच लाजली होती. त्याचं नाव घेताच आलियाचा चेहरा लाल झाला होता आणि दोन्ही हातांनी तिला चेहरा लपवावाही लागला होता. 

आता एका पत्रकार परिषदेत रणबीर कपूरला आलियाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, 'आलिया माझी क्रश आहे'. त्याने यावेळी हेही सांगितले की, त्याने आलियाचा राजी सिनेमा पाहिला आणि हा सिनेमा हिंदीतील सर्वात चांगल्या सिनेमांपैकी एक आहे. 

दरम्यान, रणबीर आणि आलिया आगामी ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करणार आहेत. अशातच त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याआधी आलियानेही रणबीर तिचा क्रश असल्याचं आणि त्याची प्रत्येक गोष्ट पसंत असल्याचं म्हटलं आहे. 

आलिया आणि रणबीर सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये एकत्र आले होते आणि त्यांनी फोटोसाठी एकत्र पोजही दिली होती. यावेळी दोघांची बॉंडिंग पाहून त्यावर अनेक अंदाज बांधले जात होते. पण दोघेही यावर फिरवून फिरवून उत्तरं देताहेत.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट