Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर कपूरचे फोटो लीक, पण लांब केस पाहून चाहते नाराज, म्हणाले- "४००० कोटींचं बजेट असूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:02 IST

'रामायण'च्या सेटवरुन रणबीरचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर श्रीरामाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तर त्याने धोतर घातलेलं दिसत आहे. पण 'रामायण'च्या सेटवरील रणबीरचे हे फोटो पाहून चाहते मात्र नाराज झाले आहेत. 

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण'च्या सेटवरुन रणबीरचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर श्रीरामाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तर त्याने धोतर घातलेलं दिसत आहे. पण 'रामायण'च्या सेटवरील रणबीरचे हे फोटो पाहून चाहते मात्र नाराज झाले आहेत. 

रेडिटवरुन रणबीर कपूरचे 'रामायण'च्या सेटवरील फोटो शेअर करण्यात आले आहेत. पण हे फोटो पाहिल्यानंतर मात्र चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे फोटो शेअर करत "तो खरंच वाईट दिसतोय", असं म्हटलं गेलं आहे. तर काहींनी कमेंट केल्या आहेत. "४००० कोटींचं बजेट असूनही एक चांगला विग बनवता आला नाही", "फेक केस आणि फेक दाढीमध्ये बॉलिवूड अडकला आहे. अनेक टीव्ही शो आणि सिनेमांमध्येही हे दिसलं आहे", अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

He looks so bad honestly 😭by u/AgreeableScarcity568 in bollynewsandgossips

'रामायण'मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. २०२६च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नितेश तिवारींच्या या सिनेमाचं बजेट ४ हजार कोटी इतकं असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता, अरुण गोविल, शिबा चड्ढा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir Kapoor's 'Ramayana' look leaked; fans disappointed by wig.

Web Summary : Leaked photos from 'Ramayana' set show Ranbir Kapoor as Lord Ram. Fans expressed disappointment with his look, particularly the wig, despite the film's huge budget. Sai Pallavi stars as Sita, and Yash plays Raavan.
टॅग्स :रामायणरणबीर कपूर