Join us

Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:44 IST

सध्या सोशल मीडियावर कंगनाचा आणि आलियाचा लग्नातील फोटो व्हायरल होतोय.

अखेर यावर्षीचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा पार पडला. १४ एप्रिलला रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत लग्न केल्यानंतर आलिया भट (Alia Bhatt) आता मिसेस कपूर झाली आहे. दोघांनी पाली हिल्स येथील त्यांच्या घरी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाची सर्व झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. यासोबतच चाहत्यांना नवविवाहित जोडप्याची झलकही पाहायला मिळाली. . त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत, सगळ्यांनीच नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. 

 लग्नसोहळा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजून ही इंटरनेटवर या लग्नाचे अनसीन व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होतायेत. पण यादरम्यान आम्ही असा एक फोटो पाहिला, जो खूपच इंटरेस्टिंग आहे.

आलियाने कॉपी केला कंगनाचा लूक?सध्या सोशल मीडियावर कंगनाचा आणि आलियाचा लग्नातील फोटो व्हायरल होतोय. मात्र आलियाचा वेडिंग लूक कंगनापेक्षा खूप वेगळा आहे. आलियानं लग्नात आयव्हरी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती.  प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं तिचीचा साडी डिझाइन केली होती. मात्र त्याच्याकडून छोटीशी चूक झाल्याचं बोललं जातंय.

सब्यसाचीनं आलियासाठी डिझाइन केलेला वेडिंग लूक हा कंगना रणौतच्या लुकशी खूपच मिळता-जुळता आहे. कंगना रणौतनेही तिचा भाऊ अक्षित राणौतच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ही साडी परिधान केली होती. विशेष म्हणजे कंगनाची  साडीही सब्यसाचीनेच डिझाइन केली होती. कंगनाचा भाऊ अक्षित राणौतचे नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते. तरीही तिने तिच्या लूकला पहाडी लुकचा टच दिला होता. एका यूजरने आलिया आणि कंगनाचे हे लूक कंपेअर करत ट्विटरवर शेअर केले आहेत.

आता आलियाने कंगना राणौतचा लूक कॉपी केल्याचे यूजरचे म्हणणे आहे. पण आलिया भट्ट तिच्या लग्नाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा लूक क्लासिक रेड लूकपेक्षा वेगळा होता. दोघेही सोबत एकदम रॉयल अंदाजात दिसत होते.  

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठआलिया भटरणबीर कपूर