Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'मधील प्रभू श्रीरामांची पहिली झलक, रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:39 IST

रामनवमी निमित्त 'रामायण'बाबत मेकर्सने मोठी अपडेट शेअर केली आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत त्या 'रामायण'मधील प्रभू श्री रामांची पहिली झलक हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच सर्वत्र रामनवमी साजरा झाली. या रामनवमी निमित्त 'रामायण'बाबत मेकर्सने मोठी अपडेट शेअर केली आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत त्या 'रामायण'मधील प्रभू श्री रामांची पहिली झलक हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'रामायण' सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी 'रामायण' सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की "शुभ रामनवमी, ही कथा आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळेच आम्ही पूर्ण जबाबदारी, श्रद्धा आणि समर्पण भावनेने एक एक पाऊल टाकत आहोत. जेणेकरून रामायण सिनेमा समर्पक भावना आणि भव्यतेसोबत पूर्ण इमानदारीने जिवंत करू शकू. सिनेमाची पुढची झलक म्हणजे प्रभू श्रीराम येत्या २ एप्रिलला हनुमान जयंतीच्या शुभमुहुर्तावर तुमच्यासमोर आणण्यासाठी उत्सुक आहोत. आमची इतक्या वर्षांची मेहनत या भव्य रिलीजमधून समोर येईल. आणि संपूर्ण जगभरात ते साजरं केलं जाईल. तुम्ही दाखवलेलं प्रेम, विश्वास आणि धैर्यासाठी धन्यवाद", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. यश रावणाच्या भूमिकेत तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सिनेमात अरुण गोविल, रवि दुबे, लारा दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २०२६च्या दिवाळीत हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं बजेट सुमारे ४००० कोटी इतकं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir Kapoor's 'Ramayana' First Look as Lord Rama on Hanuman Jayanti!

Web Summary : The first glimpse of Ranbir Kapoor as Lord Rama in Nitesh Tiwari's 'Ramayana' will be revealed on Hanuman Jayanti. Makers shared the update on Ram Navami. The film is slated for a 2026 Diwali release.
टॅग्स :रामायणरणबीर कपूर