Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण' सिनेमाची मालिकेसोबत तुलना! रामानंद सागर यांचा मुलगा स्पष्टच बोलला, म्हणाला-"रणबीर आजच्या काळातील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:52 IST

अनेकांनी 'रामायण' सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेसोबत केली आहे. यावर आता राम सागर यांचा मुलगा मोती सागर याने भाष्य करत अशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. 

नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेला 'रामायण' सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच समोर आली. यातून प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरही दिसला. मात्र अनेकांनी 'रामायण' सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेसोबत केली आहे. यावर आता राम सागर यांचा मुलगा मोती सागर याने भाष्य करत अशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. 

पीटीआयशी बोलताना मोती सागर म्हणाले, "लोकांनी अशी तुलना करणं चुकीचं आहे. आमच्या 'रामायण' मालिकेचा एक एपिसोड ३०-४० मिनिटांचा असायचा. असे ७८ एपिसोड होते. पण, सिनेमा मात्र ३-४ तासांचा आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये बराच फरक असेल. कारण एका मालिकेत तुम्हाला अनेक छोट्या छोट्या गोष्टी दाखवता येतात. माझे वडील राम भक्त होते. 'रामायण' बनवणं हे त्यांचं स्वप्न होतं. २-३ वर्ष आम्ही सगळ्यांनीच 'रामायण'साठी झोकून दिलं होतं". 

'रामायण' सिनेमात रणबीर कपूर साकारत असलेल्या प्रभू श्रीराम भूमिकेबाबतही त्यांनी भाष्य केलं. "मला रामायण सिनेमापासून खूप अपेक्षा आहेत. रणबीर कपूर आजच्या काळातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर तो योग्य भाव त्याच्या अभिनयातून व्यक्त करताना दिसतो. पण, या टीझरवरुन सध्या सिनेमा कसा असेल हा अंदाज आपण बांधू शकत नाही", असं ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ramayan Film vs. Series: Ramanand Sagar's Son Speaks Out

Web Summary : Ramanand Sagar's son, Moti Sagar, says comparing the new 'Ramayan' film to their series is unfair due to the difference in format. He appreciates Ranbir Kapoor's acting talent and has high hopes for the movie, noting it's hard to judge from the teaser alone.
टॅग्स :रामायण सिनेमारामायणरणबीर कपूर