Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नि:शब्द' व 'आग'मध्ये बिग बींना घेऊन चुकलो - राम गोपाल वर्मा

By admin | Updated: December 7, 2015 13:27 IST

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना 'नि:शब्द' आणि 'आग' या चित्रपटांमध्ये कास्ट करून मी चूक केली असे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना 'नि:शब्द' आणि 'आग' या चित्रपटांमध्ये कास्ट करून मी चूक केली असे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. 
'गन्स अँड थाईज' हे राम गोपाल वर्मा यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.  त्यातील एका लेखात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही काही विचार मांडले आहेत. खुद्दार चित्रपटातील अमिताभ यांचा अभिनय पाहून मी प्रभावित झालो होतो, पण एक तरूण मुलगी व तिच्या मैत्रीणीचे वडील यांची प्रेमकहाणी दाखवणारा 'नि:शब्द' आणि शोलेचा रिमेक असलेला 'आग' या चित्रपटात अमिताभ बच्चनना घेऊन मी चूक केली. 
आता या गोष्टीचं अमिताभ यांना काय घेण-देणं असा प्रश्व कोणी विचारू शकतो. पण मला माहीत आहे की माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांना नक्की पश्चाताप होत असेल. मात्र आपण आपलं सर्वोत्तम काम केलं नाही, असं त्यांना वाटणार नाही. या चित्रपटांसाठी त्यांची केलेली निवड चुकीची ठरली, असं मला वाटतं, असे वर्मा यांनी म्हटले आहे.