Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतच्या पतीची तुरुंगातून सुटका, म्हणाला, "सगळं सत्य समोर येणार, तिच्यासोबत...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 17:19 IST

राखीसोबत आणखीही काही लोक आहेत सामील असल्याचंही तो म्हणाला.

'ड्रामा क्वीन'राखी सावंत (Rakhi Sawant) मध्यंतरी पती आदिल खानमुळे (Adil Khan) प्रसिद्धीझोतात आली होती. आदिल खानविरोधात तिने फसवणूक, मारहाणीची तक्रार केली होती. सुरुवातीला लग्नानंतर पापाराझींसमोर आनंदाने येणाऱ्या या कपलची खरी बाजू सर्वांनाच कळली. राखी सावंतच्या आरोपांनंतर आदिल खान तुरुंगात गेला. आता अनेक महिन्यांनंतर त्याची सुटका झाली आहे.

आदिल खान म्हैसूर स्थित जेलमध्ये कैदेत होता.राखी अनेकदा आपल्या पतीविरोधात पापाराझींसमोर बोलायची.आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिल खानला पहिल्यांदाच मुंबईत पाहिले गेले. लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन राखी सावंतची पोलखोल करणार असल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला, 'माझ्यासोबत खूप चुकीचं झालं आहे. मी काही दिवसातच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळं सत्य सांगणार आहे. कोणीही येऊन मला तुरुंगातून पाठवून पब्लिसिटी तर नाही घेऊ शकत.'

तो पुढे म्हणाला, 'मी तुम्हाला सांगेन की हे सगळं का आणि कसं झालं. माझ्या बाजूची इत्थंभूत कहाणी मी सांगेन. मला कसं फ्रेम केलं गेलं हेही सांगेन. राखीच नाही तर आणखीही काही लोक यामध्ये सामील होते. कोटी रुपये मी त्यांना द्यायचेत की त्यांनी मला द्यायचेत हे कळेल.' टेली टॉकने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आदिलचा व्हिडिओ  पोस्ट केला आहे.

राखी सावंत आणि आदिलने २०२२ मध्ये निकाह केला होता. राखीने ७ महिन्यांनंतर हे जाहीर केले होते. राखीने इस्लाम धर्म कबूल केल्याचंही तिने सांगितलं होतं. आता ती आदिलपासून घटस्फोट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच म्हणाली.

टॅग्स :राखी सावंतसोशल मीडियाटेलिव्हिजन