'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. विशेषतः 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जेव्हापासून राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे, तेव्हापासून घरात एकच खळबळ उडाली आहे. राखीने आपल्या अतरंगी वागण्याने सदस्यांच्या नाकात दम करून ठेवला आहे. अशातच राखीच्या सततच्या फ्लर्टिंगमुळे राकेश बापट इतका त्रस्त झाला आहे की, त्याने थेट बिग बॉसकडे त्याला घरातून बाहेर काढण्याची विनंती केली.
बिग बॉसच्या घरात राखी आणि राकेशमधील मजेशीर जुगलबंदी पाहायला मिळत आहे. राकेश राखीला विचारतो, "उकडलेले गाजर फेकून देऊ का?" त्यावर राखी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर देते, "तूच माझं गाजर आहेस, मला ते दुसरं गाजर नको". राखीचं हे बोलणं ऐकून राकेश हताश होऊन "अरे यार" म्हणताना दिसतो.
इतक्यावरच न थांबता राखीने कहरच केला. जेव्हा तिला तिचं नाव विचारलं गेलं, तेव्हा तिने चक्क 'राखी सावंत बापट' असं नाव सांगितलं. स्वतःच्या आडनावापुढे राखीचं नाव जोडलेलं ऐकताच राकेशचा धीर सुटला आणि तो म्हणाला, "अरे यार, प्लीज यार बस कर आता!". राखी एवढ्यावरच थांबली नाही, तिने राकेशला डिवचत म्हटले की, "तुला अजून माझं कर्ज फेडायचं आहे". राखीच्या या सततच्या फ्लर्टिंगमुळे राकेश इतका हैराण झाला की, तो थेट घराच्या मुख्य दरवाजाकडे पळत सुटला. दरवाजाजवळ जाऊन त्याने बिग बॉसकडे हात जोडले आणि विनवणी केली, "बिग बॉस, प्लीज मला इथून बाहेर काढा!"
Web Summary : Rakhi Sawant's wild card entry on 'Bigg Boss Marathi 6' has stirred chaos. Rakesh Bapat, annoyed by Rakhi's constant flirting, pleaded with Bigg Boss to be removed from the house after she jokingly added 'Bapat' to her name.
Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' में राखी सावंत की एंट्री से तहलका मचा है। राखी के लगातार फ्लर्ट से तंग आकर राकेश बापट ने बिग बॉस से घर से निकालने की गुहार लगाई, जब राखी ने मज़ाक में अपने नाम के आगे 'बापट' जोड़ा।