'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाला (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. हा शो आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे यंदाचे टॉप-५ सदस्य आहेत. 'ड्रामा क्विन' राखी सावंत ट्रॉफी जिंकेल अशी आशा तिच्या चाहत्यांना होती. पण, असं घडलं नाही. टॉप-५ मध्ये येण्याआधीच राखी एलिमिनेट झाली. तिची एक्झिट चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली असली, तरी फिनालेमध्ये मात्र ती एका वेगळ्याच रुबात एन्ट्री घेणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाच्या फिनालेसाठी ड्रेस घ्यायला राखी थेट दुबई पोहचली. राखीने चक्क १० लाख रुपयांचा डिझायनर ड्रेस खरेदी केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राखी दुबईतील एका आलिशान शोरूममध्ये दिसत आहे. ती म्हणते "मी आता दुबईतील एका नामवंत दुकानात आली आहे. इथे प्रत्येक ड्रेसची किंमत ८ ते १० लाखांच्या घरात आहे. मी 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेसाठी १० लाखांचा एक खास ड्रेस फायनल केला आहे". इतकेच नाही तर, तिने अशाच प्रकारचे १०-१२ लाखांचे सुमारे ४-५ ड्रेस खरेदी केल्याचा दावाही केला.
टॉप-५ मध्ये चुरस! तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद यांच्यात आता विजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. १९ एप्रिलच्या महाअंतिम सोहळ्यात या पाच जणांपैकी कोण बाजी मारणार आणि ट्रॉफी उंचावणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : Rakhi Sawant, eliminated from Bigg Boss Marathi 6, purchased a ₹10 lakh dress in Dubai for the finale. Tanvi Kolte, Rakesh Bapat, Anushree Mane, Vishal Kotian and Dipali Sayyed are top 5 contestants.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 से बाहर हुईं राखी सावंत ने फिनाले के लिए दुबई में 10 लाख रुपये का ड्रेस खरीदा। तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन और दीपाली सय्यद टॉप 5 प्रतियोगी हैं।