Join us

रजनीकांत यांची मुलगी घटस्फोट घेण्याची शक्यता

By admin | Updated: September 17, 2016 22:41 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत लवकरच पती अश्विन रामकुमारपासून घटस्फोट घेण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.17- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत लवकरच पती अश्विन रामकुमारपासून घटस्फोट घेण्याची शक्यता आहे.  सौदर्या आणि अश्विन यांनी सहमतीने चेन्नईच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केल्याचं वृत्त आहे.

सौंदर्या ही रजनीकांत यांची लहान मुलगी आहे. 2010 मध्ये तिचा विवाह झाला होता तर गेल्याच वर्षी त्यांना एक मुलगा झाला आहे. मात्र, दोघांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमधील संबंध बिघडले होते असं सांगितलं जात आहे. रजनीकांत यांनी स्वतः दोघांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचंही वृत्त आहे.