Join us

रजनीकांत, राधिका आपटेच्या कबालीच्या चित्रीकरणास शुभमुहूर्तावर सुरुवात

By admin | Updated: September 17, 2015 18:52 IST

रजनीकांत व राधिका आपटे मुख्य भूमिकेत असलेल्या कबाली या चित्रपटाच्या चित्रीकरणास आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १७ - रजनीकांत व राधिका आपटे मुख्य भूमिकेत असलेल्या कबाली या चित्रपटाच्या चित्रीकरणास आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. या चित्रपटामध्ये रजनीकांत वृद्धत्वाकडे झुकत असलेल्या डॉनची भूमिका साकारणार असून ती चेन्नईतल्या एका डॉनच्या आयुष्यावर बेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
रजनीकांतची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरच्या माध्यमातून डॉनच्या भूमिकेत असलेला रजनीकांत गगनचुंबी इमारतीत बसलेला असून मागे मलेशियातलं बडं शहर दिसत असल्याचं पोस्टर रिलीज केलं आहे. या चित्रपटात राधिका आपटे रजनीकांतसोबत मुख्य भूमिकेत आहे. कलाईसरन, धनसिखा आदी कलाकारही या चित्रपटात आहेत. याआधीचे दोन महत्त्वाकांक्षी सिनेमे बॉक्स ऑफिसवर विशेष चालले नसल्यामुळे या चित्रपटाकडून रजनीप्रेमींना खूप आशा आहेत. कबालीमध्ये माझ्यातला कलाकार तुम्हाला परत बघायला मिळेल असं सांगत रजनीकांतने उत्सुकता निर्माण केली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून रजनीकांतचा हा १५९वा चित्रपट आहे.