Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेशमबरोबरचा रोमान्स आला अंगलट, राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'मधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 10:37 IST

अभिनेता राजेश शृंगारपुरेला मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘वीकेंडचा डाव’ या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ महेश मांजरेकरांनी रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांवरून त्या दोघांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

मुंबई:  अभिनेता राजेश शृंगारपुरेला मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘वीकेंडचा डाव’ या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ महेश मांजरेकरांनी रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांवरून त्या दोघांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर राजेश शृंगारपुरेला मराठी बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं आहे. राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर लावला होता. या दोघांना बिग बॉस आणि वाईल्ड कार्ड एण्ट्री घेतलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरने चांगलंच झापलं होतं.सोशल मीडियावरून राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या अफेअर्सवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया उमटत होत्या. बिग बॉस या शोमुळे कलर्स मराठी या वाहिनीवर टीका केली जात होती. बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो कुटुंबीयांसमवेत घराघरात पाहिला जात असल्यानं आक्षेपार्ह दृश्य दाखवणं उचित नाही, असं म्हणत नेटिझन्सनं राजेश शृंगारपुरेवर टीका केली होती.राजेशला मुलं-बाळ आहेत, त्याने याचं भान राखून वागावं, असा सल्लाही ट्विटरवरून दिला जात होता. राजेश व रेशम हे दोघे ज्या प्रकारे बिग बॉसच्या घरात वागत आहेत, त्यातून विवाहबाह्य संबंधांबद्दलचा संदेश जात असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे राजेश-रेशमला घरातून बाहेर काढा, अशी कडवट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेश शृंगारपुरेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीराजेश श्रृंगारपुरेरेशम टिपणीसकलर्स मराठी