Join us

शाहरुखसाठी बनवली राजधानी एक्स्प्रेस

By admin | Updated: October 16, 2014 04:07 IST

यशराज स्टुडियोमध्ये गेल्या काही दिवसांपासूस एक खास सेट पाहायला मिळतोय. हा सेट दिग्दर्शक मनीष शर्माच्या आगामी फॅन या चित्रपटासाठी बनवण्यात आला आहे.

यशराज स्टुडियोमध्ये गेल्या काही दिवसांपासूस एक खास सेट पाहायला मिळतोय. हा सेट दिग्दर्शक मनीष शर्माच्या आगामी फॅन या चित्रपटासाठी बनवण्यात आला आहे. या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत असणार आहे. या सेटवर ट्रेन दिसत असून, खासकरून एका फाईट सिक्सेंससाठी या ट्रेनचा वापर केला जाणार आहे. सूत्रांनुसार यशराज स्टुडियोमध्ये राजधानी एक्स्प्रेस बनवली जात आहे. फॅनचे शूटिंग नुकतेच सुरू झाले असून यासंबंधीची बरीचशी माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. स्वत:ला शाहरुखचा सर्वात मोठा फॅन मानणारा मनीष या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी प्री-प्रोडक्शनच्या कामाकडेही लक्ष देत आहे. प्रसिद्ध स्पेशल मेकअप इफेक्टस् आर्टिटस् ग्रेग कॅनम चित्रपटात शाहरुखला नवा लूक देणार आहे.