Riteish Deshmukh Movie Raja Shivaji First Poster: गेल्या अनेक दिवसांपासून रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चांगलीच उत्सुकता होती. सिनेमाचं असणारं मोठं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असल्याने हा सिनेमा भव्यदिव्य असणार यात शंका नाही. अशातच 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज भेटीला आलंय. शिवजयंतीचं औचित्य साधून रितेश देशमुख आणि सिनेमाच्या टीमने हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. यात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुखचा जबरदस्त लूक दिसतोय.
पोस्टरमध्ये काय?
'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरकडे पाहिल्यास दिसतं की, हातात भगवा ध्वज घेऊन रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हातात तलवार आणि कपाळावर टिळा असलेले छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला युद्धाचं वातावरण दिसत असून डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न पाहणारे शिवराय लक्ष वेधून घेत आहेत. हे पोस्टर रिलीज होताच नेटकऱ्यांनी रितेशच्या लूकला पसंती दिली असून 'हर हर महादेव'च्या घोषणा केल्या आहेत.
Web Summary : Ritesh Deshmukh embodies Shivaji Maharaj in 'Raja Shivaji'. The first poster, revealed on Shiv Jayanti, showcases Deshmukh with a saffron flag, sword, and a determined gaze, igniting excitement for the film's 2026 release. The film boasts a star-studded cast.
Web Summary : 'राजा शिवाजी' में रितेश देशमुख शिवाजी महाराज के रूप में। शिव जयंती पर जारी पहले पोस्टर में देशमुख भगवा ध्वज, तलवार और दृढ़ संकल्पित नज़र के साथ दिख रहे हैं, जिससे 2026 में फिल्म की रिलीज के लिए उत्साह बढ़ गया है। फिल्म में सितारों से भरी कास्ट है।