Join us

Raj Thackeray Birthday: राज ठाकरेंच्या वाढदिवशी सायली संजीवची पोस्ट, दिल्या खास शुभेच्छा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:42 IST

सायलीने तिच्या सोशल मीडियावरुन राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सायलीला राजकारणातही रस आहे. अभिनेत्री राजकारणात सक्रिय असल्याचंही दिसतं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायलीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

सायलीने तिच्या सोशल मीडियावरुन राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं कॅप्शनही तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत राज ठाकरेंना बर्थडे विश केलं आहे. दरम्यान, सायलीला राजकारणाचीही आवड आहे. अभिनेत्री १८ वर्षांची होण्याआधीच एका राजकीय पक्षात प्रवेश केला होता. आताही ती राजकारणात सक्रिय असल्याचं दिसतं. 

सध्या सायली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष पदी आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान सायली संजीव निवडणूक लढवण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. सायलीने अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबाही दर्शवला होता. सायली सोशल मीडियावर सक्रिय असून बस्ता, झिम्मा २, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, ओले आले, मन फकिरा, सातारचा सलमान, हर हर महादेव अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.  

टॅग्स :सायली संजीवराज ठाकरे