Join us

बाबो..! राज कुंद्राने सगळ्यांसमोर शेअर केलं बेडरुमचे सीक्रेट?, ऐकून शिल्पा शेट्टी झाली हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 14:54 IST

Raj kundra share his bedroom secret on social media :शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची क्यूट केमिस्ट्री नेहमीच चर्चेत असते. दोघांमधले बॉन्डिंग दिसून येत. हे कपल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते  आणि बर्‍याचदा चाहत्यांसोबत त्यांच्यातील गमतीशीर व्हिडीओ आणि मेम्स शेअर करत असतात. 14 फेब्रुवारीला झालेल्या व्हॅलेंटाईन डेनिमित्तही राज कुंद्राने असेच काहीसे केले आहे. पण, यावेळी राज कुंद्राने असे काही केले ज्यामुळे त्यांची शिल्पा शेट्टी लाजेने लाल झाली आहे.

शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज कुंद्रा आपल्या बेडरूमधील सीक्रेट सांगताना दिसतो आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त, या पॉवर कपलने  'यूअर ड्रीम स्टोरी' नावाची स्पर्धा ठेवली होती. हा व्हिडिओ या स्पर्धेचा प्रमोशन  व्हिडिओ आहे. ज्यामध्ये राज कुंद्रा आपल्या बेडरूमचे सीक्रेटउघड करताना दिसतो आहे. 

व्हिडिओमध्ये राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला विचारेल की तुझा आवडता जॉनर कोणता आहे? यावर शिल्पा शेट्टी काही बोलत नाहीत. राज कुंद्रा स्वत: हसतो आणि म्हणतो -  फिफ्टी शेड्स ऑप ग्रे'  शिल्पा ऐकतच लाजते आणि जोरात हसवू लागते.

इतकेच नाही तर राज कुंद्रा स्वत: हून हसतो आणि म्हणतो- सॉरी हे आमचे बेडरूमचे सीक्रेट आहे. अहो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :शिल्पा शेट्टी