Join us

गोव्यात एन्जॉय करतेय राहुल वैद्यची गर्लफ्रेंड दिशा परमार, शेअर केले हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 15:27 IST

दिशा परमार सध्या आपल्या गर्ल गँगसोबत गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

दिशा परमार सध्या आपल्या गर्ल गँगसोबत गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. गोवा व्हॅकेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

गोव्याला बॅचलर पार्टी करतेय दिशा?नॅशनल टेलीव्हिजनवर राहुल वैद्यने 'बिग बॉस 14'च्या घरातून दिशा परमारला प्रपोज केल्यापासून ती सतत चर्चेत राहिली आहे. फॅन्स हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, दिशा गोव्याला बॅचलर पार्टी साजरी करण्यासाठी गेली तर नाहीना?

दिशा राहुल वैद्यला करतेय सपोर्टआता दिशा आणि राहुल वैद्य या वर्षी किंवा पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत, हे राहुल बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरच कळेल. पण दिशा सोशल मीडियावर राहुल वैद्यला जोरदार पाठिंबा देत असून चाहत्यांना ही त्याला मत देण्याचे आवाहन करत आहे.

राहुल हा एक गायक आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करताना दिसतोय. दोन वर्षांपासून राहुल दिशाला डेअ करतोय. दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. प्यार का दर्द या टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या म्युझिक व्हिडीओत दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड भावली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 

टॅग्स :बिग बॉस १४