Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल देव वयाने १४ वर्षे लहान असणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, पहिल्यांदा सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:33 IST

राहुल देवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे.

मधुर भांडारकर यांच्या फॅशन या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री मुग्धा गोडसेला खूप लोकप्रियता मिळाली होती. मुग्धा गोडसेने फार कमी चित्रपटात काम केले आहे. मात्र तरीदेखील ती तिच्या अभिनयामुळे चर्चेत येत असते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत येत असते. मुग्धा तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेला अभिनेता राहुल देवला डेट करत आहे. आता राहुलने पहिल्यांदाच त्यांच्या नात्यावर मौन सोडले आहे.

राहुल देवने नुकतेच आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पहिली पत्नी रिना देवच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्याबाबत सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा मी विवाहीत होतो तेव्हा कोणापासूनही लग्न केल्याचे लपवले नाही. त्यावेळी मी सिनेमात देखील काम केले नाही. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी या खऱ्या असतात बाकी सर्व… जर तुमच्या आयुष्यात कुणी तरी महत्वाचे असेल तर इतरांपासून का लपवायचे हे मला कळत नाही. सुरुवातीला माझ्या मुलाला या नात्याविषयी कळले तर तो ते ऐकून कशी प्रतिक्रिया देईल याची मला थोडी भीती वाटत होती.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव यांच्यामध्ये असलेल्या वयाच्या अंतरावर तो म्हणाला की, ‘हो आमच्या वयामध्ये अंतर आहे, काही वर्षांचे. मात्र बाकी इतर अनेक गोष्टी आहेत आणि माझ्या कुटुंबाची देखील दुसरी बाजू आहे. कधीकधी असे वाटते की आयुष्यात पुढे निघून जाण्याने तुम्ही त्यांना न कळत दुखावत तर नाहीयेत ना..’

राहुलची पहिली पत्नी रीना देवचे २००९ साली निधन झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव सिद्धार्थ आहे. त्यानंतर २०१३ मध्ये राहुल देवने मुग्धा गोडसेला डेट करण्यास सुरुवात केली.

राहुल देवने चॅम्पियन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटानंतर त्याने ‘इंडियन’, ‘आशिक’, ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटांमध्येही काम केले. तसेच तो बऱ्याच वेबसीरिजमध्ये झळकला आहे.

टॅग्स :राहुल देवमुग्धा गोडसे