Join us

आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राधिकाला

By admin | Updated: April 25, 2016 03:20 IST

मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या 'मॅडली' या २० मिनिटांच्या भागात राधिका झळकली आहे. मात्र, यातील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले आहे. राधिकाने मराठीमध्ये लय भारी, तुकाराम, पोस्टकार्ड तर बॉलीवूडमध्ये शोर इन दि सिटी, मांझी : द माउंटन मॅन, बदलापूर, तरअहल्यासारख्या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिला मिळालेल्या या पुरस्कारासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता रितेश देशमुख, अर्जुन कपूर यांनी राधिकाचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली. 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात. येथे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज जुरी करतात.