मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हे नाव कुणाला माहीत नाही, असा माणूस महाराष्ट्रात तरी नक्कीच सापडणार नाही. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे, तर टॉलिवूडमध्येही रजनीकांतबरोबर झळकण्याची संधी मिळालेल्या राधिकाने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करून प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षकांना सायकॉलॉजिकल थ्रीलरच्या माध्यमातून भीती दाखवायला ती येत आहे. या भूमिकेसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून ती धडेदेखील घेत असल्याचे कळते. शाहीद कपूरच्या ‘आर. राजकुमार’चे निर्माते विकी रजनी यांच्या आगामी ‘फोबिया’ चित्रपटात ती झळकणार आहे. राधिका सांगते, मला थ्रिलर्स आणि हॉरर्स गोष्टींबद्दल कमालीचे प्रेम आहे. या जॉनरचा चित्रपट मला करायला मिळत आहे, याचाच मला खूप आनंद होत आहे. निर्माते विकी रजनी सांगतात, राधिकाने आपली अभिनय क्षमता विविध भूमिकांमधून सिद्ध केली आहे. माझ्यासह तिच्यासाठीही हा जॉनर नवा आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात वेगळाच थरार पाहायला मिळेल.
राधिका आपटेचा ‘फोबिया’
By admin | Updated: November 2, 2015 01:21 IST