लय भारी चित्रपटात रितेश देशमुखसोबत मुख्य नायिकेची भूमिका साकारत राधिका आपटेने मराठीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती तिच्या नशिबाच्या बाबतीतही लय भारी ठरली असंच म्हणावं लागेल. कारण त्यानंतर राधिका मांझी - द माऊंटनमॅन, त्याबरोबरच सुजय घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या अहल्या या शॉर्ट फिल्ममध्येही दिसली. त्यात राधिकाने एका सेक्सी गर्ल आणि सायको किलरची भूमिका वठवली होती, पण आता राधिका आपटे राहिलीय प्रेग्नंट... बसला ना आश्चर्याचा धक्का, पण चिल... ती आता एका नवीन शॉर्ट फिल्ममध्ये एका प्रेग्नंट महिलेची भूमिका साकारत आहे. ‘द कॉलिंग’ असे त्या शॉर्ट फिल्मचे नाव असून ही शॉर्ट फिल्म केवळ दोन मिनिटांची आहे. गर्भवती महिलांना आॅफिसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीवर या शॉर्ट फिल्मचे कथानक आधारित आहे, पण काहीही म्हणा... अहल्या या शॉर्ट फिल्ममधील राधिकाच्या भूमिकेवर कितीही आक्षेप घेण्यात आले असले तरी राधिकाची गाडी मात्र सध्या जोरात आहे बरं.
राधिका आपटे प्रेग्नंट ?
By admin | Updated: December 9, 2015 00:51 IST