Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वर्ल्ड वॉर 2'वर आधारित या हॉलिवूड सिनेमात दिसणार राधिका आपटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 13:28 IST

स्लमडॉग मिलेनिअऱ फेम देव पटेल याची मुख्य भूमिका असलेल्या 'द वेडिंग गेस्ट' नंतर राधिकाने आणखी एक हॉलिवूड सिनेमा साईन केलाय.

मुंबई - प्रियंका चोप्रा आणि दीपिका पाडुकोन यांच्यांनंतर आता मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. स्लमडॉग मिलेनिअऱ फेम देव पटेल याची मुख्य भूमिका असलेल्या 'द वेडिंग गेस्ट' नंतर राधिकाने आणखी एक हॉलिवूड सिनेमा साईन केलाय.

राधिका आपटे विश्व युद्ध 2 वर आधारित एका महिलाप्रधान सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा विंस्टन चर्चिल यांच्या 'सिक्रेट आर्मी' या कथेवर आधारित असून या सिनेमात राधिका एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे.

राधिका भारतीय वंशांच्या नूर इनायत खानची भूमिका साकारणार आहे. ती पहिली वायरलेस ऑपरेटर आणि ब्रिटीश गुप्तहेर होती. या सिनेमात राधिका हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लीडिया डीन पिल्चर या करणार आहेत.

या सिनेमाबाबत राधिकाने सांगितले की, 'या सिनेमाची कथा फारच इंटरेस्टिंग आहे. त्यावेळी अनेक भारतीय ब्रिटीश आर्मीचा भाग होते. पण त्यांच्याबाबत कुठेही काहीही समोर आलं नाही. नूरचे पिता हे भारतीय मुस्लिम होते'.

टॅग्स :राधिका आपटेबॉलिवूड