Join us

क्वीन की अस्वल?

By admin | Updated: July 2, 2016 03:06 IST

बॉलीवूडची क्वीन म्हणजे कंगना राणावत. क्वीन म्हटलं की तिचा अंदाज.. तिचं राहणं..

बॉलीवूडची क्वीन म्हणजे कंगना राणावत. क्वीन म्हटलं की तिचा अंदाज.. तिचं राहणं.. तिचं वागणं.. सारंकाही एखाद्या क्वीनसारखंच. क्वीनला मिळालेल्या यशानंतर तर कंगनाचा तोरा चांगलाच वाढलाय. बॉलीवूडच्या पार्ट्या, स्क्रीनिंग आणि इतर सगळ्या ठिकाणी कंगना आपल्या अनोख्या अवतारात हजेरी लावते. कंगनाची ड्रेसिंग स्टाईल, हेअर स्टाईल या सगळ्याची कायमच चर्चा होत असते. कधीकधी तर एकाच दिवशी असलेल्या दोन-दोन कार्यक्रमांत तिचा लूक पूर्ण वेगळा असल्याचंही पाहायला मिळालंय. मात्र आता एका कार्यक्रमात कंगनाचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. तिचा हा अवतार नक्कीच एखाद्या क्वीनला साजेसा नव्हता. तिच्याकडे पाहून तर अनेकांना जंगलातल्या अस्वलाची आठवण झाली. कंगणाचा अवतार हुबेहूब अस्वल असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. आता तुम्हीच सांगा तुम्हालाही वाटतेय का कंगना अस्वलासारखी?