Join us

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर थिरकणार 'क्वीन'

By admin | Updated: February 17, 2017 15:12 IST

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत चला हवा येऊ द्या' च्या मंचावर थिरकताना दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - ' चला हवा येऊ द्या ' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली असून शाहरूख खान पासून सोनम कपूर, जॉन अब्राहम ते दबंग स्टार सलमान खानपर्यंत सर्वांनीच या मालिकेत हजेरी लावली आहे.  या यादीत आता भर पडणार आहे ती बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौतचा .. कंगनाचा 'रंगून' हा चित्रपट लवकरत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर ठुमकेही लगावले. 
येत्या सोमवारी हा धमाल एपिसोड रसिकांना पाहता येणार आहे.  यानिमित्ताने प्रेक्षकांना कंगनाचा मराठमोळा अंदाज पाहता येईल. एवढेच नव्हे तर तिने मंचावरील कलाकारांसह  'लंडन ठुमकदा' गाण्यावर ताल धरत नृत्यही केलं. 
विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगुन’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे तर तिच्या सोबत शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन तगडे अभिनेते या चित्रपटात आहेत.