Join us  

अल्लू अर्जूनच्या साधेपणाने जिंकली मनं; स्टारडम विसरुन थेट पोहचला ढाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 8:55 AM

सुपरस्टार असूनही अल्लू अर्जूनने जपलाय साधेपणा

सेलिब्रेटी नेहमीच त्यांच्या महागड्या लाईफस्टाइलमुळे चर्चेत असतात. मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी अफाट यश मिळवलं असलं तरी  त्यांचे  पाय आजही जमिनीवरच आहेत. याबाबत दाक्षिणात्य सुपरस्टार हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा साधेपणा हा कायम लक्ष वेधून घेत असतो. सध्या अल्लू अर्जूनने त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अल्लू अर्जून कितीही मोठा सुपरस्टार असला तरी देखील त्याची जमिनीशी नाळ जोडलेली आहे. अनेकदा तो असं काही करून जातो की सगळ्यांचे लक्ष वेधलं जातं. सध्या अल्लू अर्जूनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी स्नेहा रेड्डीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका ढाब्यात बसलेला दिसत आहे. अल्लू अर्जुन हा फोनवर बोलताना पाहायला मिळतोय, तर स्नेहा ही जेवताना दिसत आहे.  सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अल्लू अर्जूनचीच चर्चा होतीये, जो त्याचा स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचला.

अल्लू अर्जुनचा हा साधेपणा पहिल्यांदा दिसला नसून अनेकदा पाहायला मिळाला आहे. यापूर्वी तो एका छोट्या दुकानात डोसा खाताना दिसला होता. अल्लू अर्जूनचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं अभिनय, त्यांची स्टाइल यांची भुरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असल्याचं पहायला मिळतं. अल्लू अर्जूनला इंडस्ट्रीत नाव कमाविण्यासाठी केवढी मेहनत केली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने सर्वकाही फक्त मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर कमावलंय. सुपरस्टार असूनही त्याचा साधेपणा आणि सहज वावर चाहत्यांना खूप भावतो. 

अल्लू अर्जूनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'पुष्पा २: द रुल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'पुष्पा २' या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीTollywoodसोशल व्हायरलसोशल मीडिया