अभिजित भट्टाचार्यसह अनेकांवर गुन्हा दाखलबॉलिवूड सेलीब्रिटींवर जीव ओवाळून टाकणारे अनेक प्रेक्षक असतात. मात्र कधीकधी हे स्टार्स किंवा सेलीब्रिटी असे काम करतात की त्यांच्या याच लोकप्रियतेला प्रचंड धक्का बसतो व त्यांना टीकेला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना नुकतीच घडली. ९०च्या दशकातील स्टार प्लेबॅक सिंगर अभिजित भट्टाचार्य याच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला. याआधीही असे अनेक सेलीब्रिटी अशा वादात अडकले आहेत. < अभिजित भट्टाचार्य : मुंबईत दुर्गापूजेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे अभिजित चर्चेत आला आहे. एका ३४वर्षीय महिलेने त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. उशिरा का होईना पण त्याचाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ‘याविषयी मला काहीच कल्पना नाही. तेथे खूप गर्दी होती, व्यवस्थापन चांगले नव्हतेच. पोलिसांनी व सुरक्षारक्षकांनी आपले काम केले. मात्र गेट तुटल्यामुळे लोक एकमेकांवर आदळले. हे काम हिंदूविरोधी घटकांचे असावे,’ असा उलट आरोप अभिजितने केला आहे. < अंकित तिवारी : २४ वर्षांच्या या गायकावर ८ मे २०१४ रोजी बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. २८वर्षीय जाहिरात व्यवस्थापिकेने हा आरोप केला. २०१३पासून अनेक वेळा बलात्कार झाल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते. बलात्काराच्या आरोपाखाली पुढे अंकित तिवारीला अटकही करण्यात आली होती. < इंद्र कुमार : ‘ब्रदर’ या चित्रपटात सलमान खानच्या भावाची भूमिका करणाऱ्या इंद्रकुमार या अभिनेत्यावर एका २३वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप के ला होता. चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यावर त्याने हे कृत्य केले, शिवाय याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. दोन दिवस वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याची तक्रार तिने के ली होती. < सुभाष कपूर : जॉनी एलएलबीचा दिग्दर्शक सुभाष कपूर याच्यावर अभिनेत्री गीतिका त्यागी हिने बलात्कार केल्याची कबुली देणारी एक क्लिपच सोशल मीडियावर शेअर केली होती. सुभाष कपूरची पत्नी डिंपल हिने मला असे करू नये यासाठी याचना केल्याने पोलिसांत तक्रार केली नाही, असे ती या व्हिडीओत सांगताना दिसते. मात्र नंतर हाच व्हिडीओ पुरावा मानून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती. < दिबांकर बॅनर्जी : खोसला का घोसला, लव्ह, सेक्स और धोका यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक दिबांकर बॅनर्जीवर त्याची मैत्रीण व अभिनेत्री पायल रोहतगी हिने विनयभंगाचा आरोप केला होता. एका रात्री दिबांकरने हे कृत्य केले व मी याला विरोध केल्याने अभिनयाच्या बाबतीत पॉझिटिव्ह फिडबॅक असतानाही मला शांघाईमध्ये संधी दिली नाही, असे तिने आपल्या आरोपात म्हटले होते. < शायनी आहुजा : शायनी आहुजावर त्याच्या घरातील २०वर्षीय मोलकरणीने बलात्काराचा आरोप केल्यावर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणाची वाच्यता केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही दम दिल्याचा आरोप पीडितेने केला होता. सुरुवातीला शायनी आहुजाने सारे आरोप फेटाळले; नंतर मात्र त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली. < मधुर भांडारकर : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मधुर भांडारकरवर एका अभिनेत्रीने २००४ साली तब्बल १६ वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. १९९९ ते २००४पर्यंत मला चित्रपटात मुख्य भूमिका देतो म्हणून वारंवार माझ्यावर बलात्कार केला; मात्र मला मुख्य भूमिका दिली नाही. न्यायालयाने ९ वर्षांनंतर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत हे प्रकरण धुडकावून लावले. - ेीँं.२ँं१ें@’ङ्म‘ें३.ूङ्मे
लैंगिक छळाच्या आरोपाने लोकप्रियतेला धक्का
By admin | Updated: November 2, 2015 02:25 IST