Join us
Daily Top 2Weekly Top 5

उडता पंजाबचे ‘चित्ता वे’ साँग आऊट!

By admin | Updated: May 5, 2016 03:31 IST

शाहीद कपूर ‘उडता पंजाब’ या चित्रपटात रॉकस्टारच्या भूमिकेत दिसत असून, त्यातील ‘चित्ता वे’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे डीजेच्या ऱ्हिदमवर असून, शाहीद प्रचंड हॉट

शाहीद कपूर ‘उडता पंजाब’ या चित्रपटात रॉकस्टारच्या भूमिकेत दिसत असून, त्यातील ‘चित्ता वे’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे डीजेच्या ऱ्हिदमवर असून, शाहीद प्रचंड हॉट दिसतो आहे. त्याच्या मानेवर ‘बॉर्न टू फ्लाय’ असे लिहिले असून, तो या लूकमध्ये अतिशय रॉकिंग दिसत आहे. चित्रपट १७ जूनला रिलीज होणार असून, यात करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग दिसणार आहेत. ‘उडता पंजाब’ यात पंजाबला ड्रगमुळे होणारा त्रास दाखवण्यात आला आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ‘ईश्किया’, ‘देढ इश्किया’ हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत.