Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियाचे फेसबुक अकाउंट फेक

By admin | Updated: April 24, 2016 01:46 IST

बॉलिवूड असो वा मराठी सेलेब्रिटी, भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला, तरी त्यांचे सोशल मीडियाच्या अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो.

बॉलिवूड असो वा मराठी सेलेब्रिटी, भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला, तरी त्यांचे सोशल मीडियाच्या अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रिया बापटला सामोरे जावे लागत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सनी सवांद साधला असता प्रिया म्हणाली, ‘‘देशातील किंवा बाहेरदेशातील माझे जे फॅन्स आहेत, त्यांनी मला ही गोष्ट लक्षात आणून दिली. ज्या व्यक्तीने माझे फेक अकाउंट बनविले आहे, ती माझ्या फॅन्सना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविते. पण, याबाबत मी फेसबुकलादेखील मेसेज केलेला आहे. त्यांनी व्हेरिफिकेशनसाठी माझे काही आयडी प्रूफ मागविले आहे आणि ते मी त्यांना दिलेदेखील आहेत; पण ६ ते ७ महिन्यांपासून त्यांचा काही रिप्लाय नाही आला. पण, ही प्रोसेस लवकर व्हावी, अशी माझी इच्छा आहे. तसेच आता माझे जे रियल अकाउंट आहे, ते अचानक डिसेबलदेखील झाले आहे. त्यामुळे मी माझ्या फॅन्सना आवाहन करते, की ज्यांनी कोणी त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली असेल, तर त्यांनी ती अनफ्रेंड करावी.’’