Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांकाच्या शॉर्ट ड्रेसवरून उठले वादळ!

By admin | Updated: June 2, 2017 04:34 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही तिच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही तिच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे प्रियांकाला कळले अन् तिने पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरविले. ‘अविस्मरणीय क्षण’ असे या भेटीचे वर्णन करत प्रियांकाने मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळालेत. पण तेवढ्याच अनेकांना प्रियांकाचा हा फोटो खटकलाही. खरे तर या सर्वांना प्रियांकाचा ड्रेस खटकला. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना प्रियांकाने असा शॉर्ट ड्रेस घालायला नको होता, असा सल्ला या सगळ्यांनी दिला. यावरून मग प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली. पण प्रियांका या सगळ्याची पर्वा करणाऱ्यांपैकी थोडीच आहे. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना तिनेही चांगलेच आडव्या हाताने घेतले. ट्रोल करणाऱ्यांना खरमरीत उत्तर देण्यासाठी तिने तिचा आई मधुसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांकाच्या आईनेही शॉर्ट ड्रेस घातलेला आहे आणि दोघींचेही पाय दिसताहेत.