Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका-निकचा गुपचुप साखरपुडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:52 IST

प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले.

प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी येथे आल्यानंतर त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. आता तर प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रियांकाचा वाढदिवस १८ जुलैला होता. तिच्या वाढदिवसालाच तिला खास भेट मिळाली असल्याची चर्चा आहे. प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यूयॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. निकने ही अंगठी तिला साखरपुड्यात घातली असून ते दोघे साखरपुड्यानंतर खूपच खूश आहेत. निकला वेळ देता यावा म्हणून तिने ‘भारत’ सोडला असल्याचे खुद्द दिग्दर्शक अली अब्बास जफर याने टिवटर अकाऊंटवरून शेअर केले आहे.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रा