Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका-निकच्या लग्नाला देशाची ‘ही’ महत्त्वाची व्यक्ती लावणार हजेरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 18:09 IST

मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानमधील जोधपूर येथे लग्न होणार आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता सर्वांना अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. लग्नाचे विविध अपडेटस आता सातत्याने येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानमधील जोधपूर येथे लग्न होणार आहे. या विवाहसोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. निक जोनास नुकताच दिल्लीमध्ये होता. त्यावेळी निक आणि प्रियांका यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या व्यस्त कामांमधून या लग्नाला उपस्थित राहणार का? हा प्रश्न आहे. प्रियांका आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय चांगले असल्याचे आपण याआधीही पाहिले होते. परदेशातील त्यांच्या एका दौऱ्यादरम्यान प्रियांकाने त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही या दोघांचे असणारे चांगले संबंध समोर आले होते. दरम्यान, २०१७ पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत त्यांचा साखरपुडा पार पडला. मध्यंतरी निक आणि प्रियांकाने राजस्थानला भेट दिली होती. त्यानंतर येथीलच राजमहालात विवाह करण्याचे दोघांनीही निश्चित केले. जोधपुरमधील उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निक लग्न करणार आहेत. भारतीय पद्धतीने मेहंदी, संगीत, हळद असे विधी होणार आहेत. त्याचबरोबर ख्रिश्चनपद्धतीनेही विवाहसोहळा होणार आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीप्रियंका चोप्रालग्न