प्रियांका चोप्रासाठी ही अभिमान व्यक्त करण्यासारखी बाब आहे की, तिला तिच्या करिअरमधील उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण याच्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित करण्यात आला होता. भारताचा चौथा सर्वांत मानाचा असलेला ‘पद्मश्री’ अखेर पीसीला मिळाला. राष्ट्रपती भवन आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून तिला पुरस्कार देण्यात आला. या वेळी ती सुंदरशी साडी नेसून आली होती. ती सध्या हॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘बेवॉच’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको साठीही शूटिंग करत आहे. तिने आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले असून, हा सन्मान तिच्यासाठी सर्वांत मोठा असणार, यात काही शंकाच नाही. वेल, अभिनंदन पीसी!
प्रियांका ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित
By admin | Updated: April 13, 2016 01:37 IST