Join us

प्रियंकाने शिल्पाला रडवले

By admin | Updated: September 11, 2014 02:17 IST

प्रियंका चोपडाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडण्यास भाग पाडले. ‘मेरी कोम’मधील प्रियंकाचा अभिनय बघून शिल्पाला रडू कोसळले

प्रियंका चोपडाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडण्यास भाग पाडले. ‘मेरी कोम’मधील प्रियंकाचा अभिनय बघून शिल्पाला रडू कोसळले. शिल्पानेच ‘टिष्ट्वट’ करून ही माहिती दिली. ‘नुकताच मेरी कोम बघितला. सर्व कलावंतांनी चांगला अभिनय केला; परंतु प्रियंका तू तर कमालच केलीस. तुझा अभिनय बघून मला अश्रू आवरले नाहीत, असे टिष्ट्वट शिल्पाने केले आहे. ‘मेरी कोम’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला असून, तीन दिवसांत या चित्रपटाने २७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.