Join us

प्रियंका चोप्राची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

By admin | Updated: April 27, 2016 14:14 IST

प्रियंका चोप्राने रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. २७ - 'क्वांटिको' या अमेरिकन शो मधून हॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री प्रियंका चोप्राने रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिम स्थलांतरीतांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. 
 
त्या विषयावर बोलताना प्रियंका म्हणाली की, तुम्ही कोणावर बंदी घालू शकत नाही. एका साच्यामध्ये सर्वांना बसवण हे मागासपणाचं लक्षण आहे. दहशतवादा विरोधातील लढाई इतकी किचकट झाली आहे की, त्यासाठी तुम्ही कोणा एकाला जबाबदार ठरवू शकत नाही असे प्रियंकाने सांगितले. 
 
टाईम मॅगझिनमधील जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत प्रियंकाच्या नावाचा समावेश झाला आहे. क्वांटिकोमध्ये प्रियंकाने एफबीआय एजंटची भूमिका केली आहे. त्यानंतर ती आता 'बेवॉच'मध्ये दिसणार आहे.