Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून प्रियंका चोप्राने पती निक जोनाससाठी केलेले करवा चौथचे सेलिब्रेशन ठरले खास, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:25 IST

बॉलिवूड अभिनेत्रींनी मोठ्या जल्लोषात हा उत्सुव सेलिब्रेट केला. तर प्रियंका चोप्रानेही पती निक जोनासाठी उपवास केला होता. त्याच्यासह निकसह करवा चौथचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनासह रेशीमगाठीत अडकल्यानंतर परदेशात स्थायिक झाली असली तरीही भारतीय संस्कृतीशी तिचे नातं आजही तितकंच घट्ट आहे. नुकतेच सर्वत्रच करवा चौथ सेलिब्रेट करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींनी मोठ्या जल्लोषात हा उत्सुव सेलिब्रेट केला. तर प्रियंका चोप्रानेही पती निक जोनासाठी उपवास केला होता. त्याच्यासह निकसह करवा चौथचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

यावेळी लाल रंगाची साडी प्रियंकाने परिधान केली होती.तर निक जोनासनेही साजेसा शेरवानी परिधान केला होता. सोशल मीडियावर प्रियंकाचे हे फोटो पाहून चाहतेही खुश झाले आहेत. त्यांनीही लाईक्स आणि कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. 

निक आणि प्रियंका दोघेही ट्रेंडिग कपल म्हणून ओळखले जातात. त्याची प्रत्येक गोष्ट खास असते. त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. म्हणूनच हे कपल सर्वांचे फेव्हरेट कपल बनले आहे. दोघांमध्येही जबरदस्त केमिस्ट्री आहे. लग्नानंतर या दोघांते नातंही अधिक घट्ट झाले आहे. 

१ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं. मध्यंतरी प्रियंका लवकरच गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या  होत्या. प्रियंका गर्भवती असल्याच्या चर्चांनी  सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे या फोटोमुळे प्रियंका-निकच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं गेले.दरम्यान प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी या वृत्ताचा इन्कार करत निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे. दोघांनी शनिवारी 24 ऑक्टोबरला गुरुव्दारामध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतायेत. गुरुव्दारेमध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी संध्याकाळी ग्रँड सेलिब्रेशन केले.

ज्यात कुटुंबातले लोक आणि मित्र परिवार सामील झाला होता. आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते नेहाच्या लग्नाच्या आऊटफिट आणि फोटोंमधील तिच्या पोजने. 24 ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नात नेहा कक्करने दोन अतिशय सुंदर आऊटफिट्स परिधान केले होते

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास