Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो, सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्राला मिळतात इतके कोटी,आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:46 IST

प्रियंका चोप्रा जितकी लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता सोशल मीडियावरही पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार  सेलिब्रिटींचे फोटो व्हिडीओ नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत ते चर्चेत राहतात.सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. देसी गर्ल प्रियंका चोप्राचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. प्रियंका चोप्राचे आज जगभरात फॅन्स आहेत. 

प्रियंका जितकी लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता सोशल मीडियावरही पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. दिवसेंदिवस फॉलोअर्चा आकडाही वाढतच जात आहे.  तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडिावर चाहत्यांसह कनेक्ट असते. पण तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्रियंकाचा एक पोस्ट करण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपये इतके मानधन मिळते.

हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सोशल मीडियावर सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं हे जाहीर केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राचाच बोलबाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

प्रियंकाने निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर आता ती अमेरिकेतच स्थायिक झाली असली तरी भारतीय संस्कृतीला विसरलेली नाही. अनेकदा ती सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर करत वाहवा मिळवत असते. परदेशातही तिने आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. अनेकदा तिच्या फोटोंवरुन भारतीय संस्कृतीचे दर्शन ती घडवत असते. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास