Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राला ‘मॅडमजी’साठी वेळ नाही

By admin | Updated: September 17, 2015 02:32 IST

भा रताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मध्ये काम करीत असलेली प्रियंका

भा रताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मध्ये काम करीत असलेली प्रियंका आगामी प्रोजेक्ट ‘मॅडमजी’मध्ये दिसणार आहे. ‘मॅडमजी’ चित्रपटाचा विषय अगदीच वेगळा आहे. प्रियंकासाठीदेखील ‘मॅडमजी’ हा चित्रपट खूप महत्त्वपूर्ण समजला जात आहे. या चित्रपटाविषयी ती खूपच उत्साहित आहे. ती सध्या इतर प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने ती ‘मॅडमजी’साठी वेळ देऊ शकत नाही. चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रियंका आता ‘मॅडमजी’साठी कसा वेळ काढते, हे पाहणे रंजक ठरेल.