Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून कोरोना काळात प्रियंका चोप्रा घेतेय निकची विशेष काळजी, हा आजार आहे त्याला कारणीभूत

By गीतांजली | Updated: October 15, 2020 17:13 IST

कोरोना व्हायरसच्या या महामारी दरम्यान प्रियंका आणि निक एकमेकांची विशेष काळजी घेतायेत.

प्रियंका चोप्रा पती निक जोनससोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. कोरोना व्हायरसच्या या महामारी दरम्याम ते एकमेकांची काळजी घेतायेत. तसेच, त्याने आपला वेळेचा चांगला वापर केला. आजतकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान प्रियंका म्हणाली, आम्ही दोघे स्वत:ची खूप काळजी घेतो. कारण निकला मधुमेह आणि मला अस्थमा आहे. त्यामुळे आम्ही कोणाशी संवादताना तो कसा साधायचा याबद्दल आम्ही अत्यंत सावध आहोत.

क्वॉरंटाईन दरम्यान कामावर केले फोकस पुढे ती म्हणाली, मी बर्‍याच विकासात्मक गोष्टी करत आहे आणि बर्‍याच गोष्टींची तयारी करत आहे. त्यामुळे माझ्या आणि निकसाठी क्वॉरंटाईन टाईम खूप फायदाचा राहिला. तिला घरातून काम  करायला खूप आवडते आहे असे प्रियांकाने सांगितले. वर्कफ्रॉम होमच्या फायदांविषयी बोलताना तिने सांगितले, मी ट्रॉफिकमध्ये अडकणे आणि मीटिंग्सला जाणं मिस करत नाहीय. 

लॉकडाऊनदरम्यान प्रियंकाने बायोग्राफीवर काम सुरू केले होते. या पुस्तकाचे शीर्षक ‘अनफिनिश्ड’ असणार आहे.या पुस्तकात प्रियंकांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास चाहत्यांना वाचायला मिळणार आहे.याच बायोग्राफीच्या अनुषंगाने प्रियंकाने अनेक जुन्या आठवणी ताज्या करत, जुने फोटो, व्हिडीओ शेअर केले होता.बॉलिवूडच्या देसी गर्ल आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी प्रियंकाने बराच संघर्ष केला.  प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतेच तिने अॅमेझॉनसोबत दोन वर्षांच्या 'मल्टीमिलियन-डॉलर फर्स्ट-लुक टेलीविजन डील'वर हस्ताक्षर केले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास